ब्लॅडरमध्ये स्टोन असण्याचे ५ संकेत

जास्त वेळ ब्लॅडरमध्ये लघवी राहिल्यानं त्यात स्टोन होण्याचा धोका असतो.

छोटे स्टोन लघवीतून निघून जातात. पण स्टोनचा आकार मोठा असेल तर सर्जरी करावी लागते. 

अशात ब्लॅडरमध्ये स्टोन असल्याचे ५ संकेत आज आपण पाहणार आहोत. जेणेकरून वेळीच उपचार घेता येतील.

ब्लॅडरमध्ये स्टोन झाल्यास लघवीचा रंग बदलतो. लघवी डार्क किंवा क्लाउडी दिसते. लघवीतून रक्तही येऊ शकतं.

जर तुम्हाला अचानक पुन्हा पुन्हा लघवी लागत असेल याकडे दुर्लक्ष करू नका. हा ब्लॅडरमध्ये स्टोन असण्याचं संकेत असू शकतो.

लघवी करताना वेदना, जळजळ होत असेल, पोटाच्या खालच्या भागात किंवा लिंगात दुखत असेल तर हा ब्लॅडर स्टोनचा संकेत असू शकतो.

लघवीच्या थैलीत स्टोन झाल्यावर लघवीचा स्पीड कमी होतो. कधी कधी लघवी थांबून थांबून हळू येते.

ब्लॅडरमध्ये स्टोन झाल्यावर अनेकदा लघवी मार्गात इन्फेक्शन होतं. त्यामुळे जास्त लघवी लागणे आणि लघवीचा वास येणे असे संकेत दिसतात.

Click Here