हल्ली महिलांना दिवस राहण्यात अडचणी, मिसकॅरेज असे त्रास खूप वाढले आहेत. ते टाळण्यासाठी काही पदार्थ आपल्या आहारात असायलाच हवे.
ते पदार्थ नियमितपणे खाल्ल्यास महिलांची प्रजनन क्षमता सुधारण्यास नक्कीच मदत होते, शिवाय हार्मोन्सचा त्रासही कमी होतो.
पहिला पदार्थ आहे हिरव्या पालेभाज्या. त्यांच्यामधून लोह, फोलेट चांगल्या प्रमाणात मिळून ओव्ह्युलेशन नियमित होण्यास मदत होते.
अक्रोड आणि बदाम यांच्यातले सेलेनियम आणि व्हिटॅमिन ई प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत करतात.
अव्हाकॅडोमध्ये असणारे व्हिटॅमिन ई आणि हेल्दी फॅट्स गर्भाशयाच्या आरोग्यासाठी विशेष गुणकारी ठरतात.
प्रो बायोटिक असणारे दही देखील प्रजनन क्षमता अधिक चांगली होण्यासाठी उपयुक्त ठरते.
स्ट्रॉबेरी, ब्लुबेरी या फळांमध्ये ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर असतात. त्यामुळे स्त्रीबीज अधिक निरोगी, उत्तम होण्यास मदत होते.