फिट राहण्यासाठी प्रत्येकीने खायलाच हवे ५ पदार्थ

नातीपासून आजीपर्यंत प्रत्येक वयाेगटातल्या महिलेने पुढे सांगितलेले काही पदार्थ नियमितपणे खायलाच हवे..

त्यापैकी पहिला पदार्थ आहे शतावरी. मासिक पाळीचा त्रास, हार्मोन्सचे असंतुलन, पोटातली उष्णता असे त्रास कमी करण्यासाठी शतावरी उपयुक्त ठरते.

दुसरा पदार्थ आहे आवळा. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तसेच केस आणि त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आवळा नियमितपणे खावा.

कॅल्शियम, लोह भरपूर प्रमाणात देणारे नाचणीही प्रत्येकीसाठी उपयुक्त आहे. हाडांच्या मजबुतीसाठीही नाचणी उपयुक्त ठरते.

रोज नियमितपणे तूप खाणेही खूप फायदेशीर असते. घरी तयार केलेले साजुक तूप याेग्य प्रमाणात खाल्ल्यास वजन वाढत नाही. उलट आरोग्यासाठी ते लाभदायक ठरते.

कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन ई आणि काही चांगले फॅट्स असणारे काळे तीळही रोज नेमाने खायला हवे. 

Click Here