वाफवून केलेले ५ चविष्ट पदार्थ 

वाफवलेले पदार्थ चवीला छान लागतात आणि पौष्टिकही असतात. पाहा विविध रेसिपी. 

वाफवून केलेले पदार्थ पचायला सोपे आणि आरोग्यदायी असतात. नेहमीचे इडली-ढोकळा बाजूला ठेवून थोडे वेगळे आणि चविष्ट असे पदार्थही घरी सहज करता येतात. 

पहिला पदार्थ म्हणजे मोड आलेल्या कडधान्यांचे स्टीम्ड कटलेट. मोड आलेली मटकी, मूग, थोडा बटाटा आणि मसाले एकत्र करून छोटे गोळे तयार करायचे आणि ते वाफवायचे.

दुसरा प्रकार म्हणजे भाजीचे स्टीम्ड मोमोज. कोबी, गाजर, शिमला मिरची आणि मसाले यांचं सारण करून मैद्याऐवजी कणकेच्या पारीत भरून मोमोज तयार करा. वाफवल्यामुळे ते तेलकट नसतात आणि चटणीसोबत छान लागतात.

राजस्थानच्या ताफ्यातील जोफ्रा आर्चरनं २०२५ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध एकही विकेट न घेता ४ षटकात ७६ धावा खर्च केल्या.

चौथा प्रकार म्हणजे स्टीम्ड हांडवो (तेल न घालता). तांदूळ-बेसन, दही आणि भरपूर भाज्या घालून मिश्रण तयार करायचे आणि ते वाफवून शिजवायचे. पारंपरिक हांडवोपेक्षा हा प्रकार हलका आणि हेल्दी असतो.

पाचवा आणि खास प्रकार म्हणजे स्टीम्ड पनीर रोल. पनीर, गाजर, सिमला मिरची यांचं सारण तयार करून त्याचे रोल बनवून वाफवायचे. हा प्रकार मुलांनाही आवडतो आणि प्रोटीनसाठी उत्तम आहे.

Click Here