टाचांना खूप भेगा पडल्या असतील तर पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा..
रात्री झोपण्यापुर्वी पाय स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर खोबरेल तेल थोडं काेमट करून ते पायांना चोळा. भेगा कमी होतील.
ग्लिसरीन आणि गुलाबजल सम प्रमाणात एकत्र करून पायांना चोळल्यानेही भेगा कमी होतात.
मध आणि लिंबाचा रस सम प्रमाणात एकत्र करा. हे मिश्रण पायांना लावा. त्यानंतर १० मिनिटांनी स्क्रबरने पाय घासून काढा. पाय स्वच्छ होतील.
साजूक तुपाने तळपायांना मालिश केल्यानेही पायांवरच्या भेगा कमी होण्यास मदत होते.
गरम पाण्यात सैंधव मीठ घाला. त्यात काही वेळ पाय भिजत ठेवा आणि नंतर स्क्रबरने पाय घासा. टाचा स्वच्छ होतील.