वाढलेलं कोलेस्टेरॉल लवकर कमी करण्यासाठी ५ टिप्स..

वाढलेलं कोलेस्टरॉल ही आता अनेक जणांसाठी चिंतेची बाब झाली आहे.

कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि ते वाढलं असेल तर कमी करण्यासाठी काय करावं, याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे..

त्यातला पहिला मुद्दा म्हणजे पचनक्रिया चांगली असेल तर कोलेस्टेरॉल नियंत्रित राहातं. यासाठी आहारातील फायबरयुक्त पदार्थ वाढवा.

ज्या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, असे पदार्थ खा.

जेवणाच्या आधी सुकामेवा, फळं, दही, ताक असे आरोग्यदायी पदार्थ जास्त प्रमाणात घ्या. यामुळे अतिजेवण टाळले जाईल.

लसूण आणि आलं कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे आहारातला त्यांचा वापर वाढवा.

अव्हाकॅडो, अक्रोड, जवस जास्त प्रमाणात खा. कारण त्यांच्यामध्ये असणारं ओमेगा ३ फॅटी ॲसिड कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतं. 

Click Here