थायरॉईडचा त्रास असणाऱ्यांनी खाऊ नयेत 'हे' पदार्थ

थायरॉईडचा त्रास असेल तर काही पदार्थ खाणं टाळायलाच हवं...

त्यापैकी पहिला पदार्थ आहे सोया प्रोडक्ट्स. सोयाबीन, टोफू, सोया चंक्स, सोया मिल्क हे पदार्थ खाणं टाळायला हवं.

ब्रोकोली, फुलकोबी, पत्ताकोबी अशा भाज्याही कच्च्या खाणं टाळायला हवं. कारण त्यामुळेही थायरॉईडचा त्रास वाढू शकतो.

केक, पेस्ट्री असे शुगरी पदार्थ टाळावेत. कारण त्यामुळे शरीरातल्या हार्मोन्सचं प्रमाण बिघडतं. थायरॉईडवरही त्याचा परिणाम होतो.

थायरॉईडचा त्रास असणाऱ्यांनी कॅफिनयुक्त पदार्थही कमीतकमी घ्यायला हवे.

थायरॉईडचा त्रास असेल तर तेलकट, तुपकट पदार्थांपासून थोडं दूर राहिलेलंच बरं.. 

Click Here