त्वचेचं सौंदर्य नॅचरली टिकवून ठेवायचं असेल तर पुढे सांगितलेले काही पदार्थ तुमच्या आहारात असावेच..
त्यापैकी पहिला पदार्थ आहे बदाम. त्याच्यामध्ये असणारं व्हिटॅमिन ई त्वचेची पुरेपूर काळजी घेतं.
पपईमधलं व्हिटॅमिन सी आणि पेपेन त्वचेला चमकदार ठेवण्यास मदत करतं.
टोमॅटोमधे लायकोपीन असतं. युव्ही रेजपासून ते त्वचेचं नैसर्गिकपणे संरक्षण करतं. स्किन टोन राहण्यास मदत करतं.
पालकामध्ये ॲण्टीऑक्सिडंट्स असतात. त्वचा तरुण राहण्यास त्यामुळे मदत होते..
त्वचा चांगली राहण्यासाठी नियमितपणे अक्रोड नक्की खा. त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. त्वचेला छान पोषण मिळतं.