केसांच्या वेगवेगळ्या समस्या कमी करण्यासाठी रोजमेरी तेल अतिशय उपयुक्त ठरते.
रोजमेरी तेलामध्ये ॲण्टीबॅक्टेरियल आणि ॲण्टीफंगल गुणधर्म असतात. त्यामुळे कोंडा कमी करण्यासाठी ते फायदेशीर ठरते.
रोजमेरी तेलामध्ये असणाऱ्या ॲण्टीऑक्सिडंट्समुळे केसांची मुळं पक्की होऊन केस गळणं कमी होतं.
केसांची वाढ चांगली होण्यासाठी रोजमेरी तेल उपयुक्त ठरते.
केस कोरडे होऊन केसांची टोके दुभंगली जातात. हा स्प्लिट हेअर त्रास कमी करण्यासाठी रोजमेरी तेल उपयुक्त ठरते.
रोजमेरी तेलामुळे केस छान मॉईश्चराईज होतात. त्यामुळे ते स्मूथ आणि सिल्की बनतात.