दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला खास कारणामुळे चर्चेत आलीय. २३ वर्षीय अभिनेत्रीच्या घरी छोट्या पाहुणीचं आगमन झालंय.
अभिनेत्री श्रीलीलाच्या घरी आलेल्या चिमुकलीची झलक सोशल मीडियावर दाखवली आहे. या फोटोत ती बाळावर प्रेम करताना दिसतेय.
श्रीलीला तिच्या गालावर किस करताना आणि लाड करताना दिसतेय.
चिमुरडीसोबतचा फोटो शेअर करत अभिनेत्रीने लिहिले की, घरात एक नवीन सदस्य दाखल झालीय. थेट मनात जागा केलीय. यासोबत तिने हार्ट इमोजी शेअर केलीय.
श्रीलीलाने अद्याप स्पष्ट केलेले नाही की, तिने या बाळाला दत्तक घेतले आहे की ती तिच्या कुटुंबातील सदस्य आहे.
श्रीलीलाचे या चिमुकलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. चाहते या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
एका युजरने लिहिले की, एका फ्रेममध्ये दोन बेबीज. दुसऱ्याने लिहिले की, दोघीही क्युट वाटताहेत ना? तर काही युजर्सनी हार्ट इमोजी शेअर केलेत.
श्रीलीलाने २०२२ साली दोन दिव्यांग बाळांना दत्तक घेतलंय.
वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर श्रीलीला लवकरच कार्तिक आर्यनसोबत आशिकीची फ्रेंचाइजी सिनेमात झळकणार आहे. तसेच सध्या त्या दोघांच्या अफेयरची चर्चादेखील होत आहेत.