महाराष्ट्रातील १० किल्ले जागतिक वारसा यादीत, जाणून घ्या त्यांची वैशिष्ट्ये 

शिवनेरी 
छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ 

रायगड 
 
छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून १६ व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनविली

लोहगड 
सातवाहन, चालुक्य, यादव, बहामनी, निजाम आणि मराठा अशा अनेक राजवटींमध्ये लोहगडावर वेगवेगळ्या शासकांचे आधिपत्य 

राजगड 
राजगड किल्ला म्हणजे डोंगरांची रांगच. त्याला सगळीकडून वेढा घालणे कठीण होते. या वर्णनांवरुन राजगडाबद्दल मुगल सैन्याला भीती वाटत होती हे निश्चित.

प्रतापगड 
प्रतापगडची महत्त्वाची ओळख म्हणजे या किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यात ऐतिहासिक युद्ध घडले

पन्हाळा 
किल्ल्याच्या सुरक्षेसाठी एकूण 35 बुरुज बांधले गेले आहेत. हे बुरुज काटेकोर आकारात असून त्यांच्यावर तोफांची सोय केली आहे

विजयदुर्ग 
छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीकडून हा किल्ला जिंकल्यावर विजयाचे प्रतिक म्हणून या किल्ल्याला “विजयदुर्ग” हे गौरवशाली नाव दिले

सिंधुदुर्ग
शिवरायांच्या काळात सागरी व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कोकण किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी हा किल्ला अत्यंत उपयोगी ठरला.

सुवर्णदुर्ग 
१६ व्या शतकात निजामशाही राजवटीनंतर हा किल्ला आदिलशाही घराण्याच्या ताब्यात आला. १६६० मध्ये शिवरायांनी तो जिंकला.

खांदेरी 
शिवाजी महाराजांच्या काळापासून इंग्रज या किल्ल्यासाठी लढत होते, अखेर १८१८ मध्ये त्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला. 

Click Here