वजन कमी करतानाही बिंधास्त खा ७ स्ट्रीट फूड

सगळेच स्ट्रीट फूड वाईट नसतात, काही स्ट्रीट फूड हे हेल्दी, हलके आणि पोषक असतात. 

वजन कमी करताना आपण बहुतेक वेळा स्ट्रीट फूड खाणे टाळतोच. 

बरेचसे स्ट्रीट फूडस हे तेलकट, तळलेले आणि प्रोसेस्ड असल्याने वेटलॉस करताना असे पदार्थ खाणे टाळलेलेच उत्तम. 

असे असले तरीही सगळेच स्ट्रीट फूड वाईट नसतात, काही स्ट्रीट फूड हे हेल्दी, हलके आणि पोषक असतात. 

असे काही स्ट्रीट फूड्स योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाल्ले, तर वेटलॉसमध्येही मदत करतात.

लिंबू, मीठ, तिखट लावून भाजलेला मका खाल्ल्यास स्वाद व पोषण दोन्ही मिळते. यात फायबर्स, अँटीऑक्सिडंट्स असल्याने वेटलॉससाठी देखील फायदेशीर आहे. 

स्ट्रीट फूड्समध्ये आपण फ्रुट चाट देखील खाऊ शकता. फळांमधील पाण्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते, परिणामी वेटलॉस करण्यास मदत होते. 

मोड आलेल्या कडधान्यांचे चाट देखील आपण खाऊ शकता. वजन कमी करण्यासाठी मोड आलेली कडधान्यांचे खाणे फायदेशीर असते. 

स्ट्रीट फूड्समध्ये आपण दही वडा देखील खाऊ शकता, कारण दह्यात प्रोटिन्स व प्रोबायोटिक्स असतात जे वजन कमी करण्यासाठी मदत करतात. 

आपण वेटलॉससाठी स्ट्रीट फूड्समध्ये भेळपुरी खाऊ शकता, यात असलेले सगळे जिन्नस कमी कॅलरीजयुक्त असल्याने वेटलॉस करण्यास मदत होते. 

आपण स्ट्रीट फूड्समध्ये वाफवलेली इडली देखील खाऊ शकता, कारण यात खूपच कमी कॅलरीज असतात. 

वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरुन तयार केलेलं सॅन्डविच हे फेमस स्ट्रीट फूड्स आपण वजन कमी करण्यासाठी खाऊ शकता.

Click Here