ट्रेंडी-एलिगंट कॉर्सेट ब्लाऊजचा झक्कास ट्रेंड!

सध्या बरीच चलती असलेला आणि गाजलेला ट्रेंड म्हणजे कॉर्सेट ब्लाऊज.

सध्याच्या फॅशन आणि स्टाईलमध्ये पारंपरिक पोशाखाला मॉडर्न ट्विस्ट देण्याचा नवा ट्रेंड दिसून येतो. 

सध्या बरीच चलती असलेला आणि गाजलेला ट्रेंड म्हणजे कॉर्सेट ब्लाऊज. 

पूर्वी फक्त वेस्टर्न आउटफिट्समध्ये वापरले जाणारे कॉर्सेट्स आता साडी, लेहेंगा आणि इंडो-वेस्टर्न लुकमध्ये देखील पाहायला मिळतात. 

बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी देखील चक्क या ट्रेंडला फॉलो केलं आहे.

जरी वर्क असलेले कॉर्सेट ब्लाऊज ग्लॅमरस लूक देतात. लग्न किंवा रिसेप्शन लूकसाठी फारच सुंदर दिसतात. 

फ्लोरल कॉर्सेट ब्लाऊज लेहेंगा किंवा साडीवर शोभून दिसतात, वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची प्रिंट असल्याने ब्लाऊज उठून दिसतो. 

स्ट्रेपलेस कॉर्सेट ब्लाऊज आपण साडीवर घालून हटके इंडो - वेस्टर्न लूक कॅरी करु शकता. परफेक्ट पार्टी लूकसाठी स्ट्रेपलेस कॉर्सेट ब्लाऊज क्लासी दिसतात. 

वन साईडेड फ्लोरल कॉर्सेट ब्लाऊज एक स्टाईल स्टेटमेंट आहे. पारंपरिक पोशाखाला मॉडर्न लूक हवा असेल तर हा ब्लाऊज परफेक्ट आहे. 

जर आपल्याला क्लासी आणि बोल्ड लूक हवा असेल तर, साडी - लेहेंग्यावर आपण असा डीप नेक कॉर्सेट ब्लाऊज घालू शकतो. 

बॅकलेस, स्लीवलेस, लेसिंग डिटेल्स, शोल्डर कट हे सर्व डिझाइन्स कॉर्सेट ब्लाऊजला बोल्ड आणि ट्रेंडी बनवतात.

Click Here