दीपिका ते आलिया, बॉलिवूड क्वीन्सचं शिक्षण किती?

अनेक टॉप अभिनेत्री केवळ अभिनयातच नव्हे तर शिक्षणातही यशस्वी ठरलेल्या आहेत.

बॉलिवूडच्या झगमगाटात अभिनेत्रींच्या सौंदर्यापेक्षा त्यांची बुद्धिमत्ता आणि शैक्षणिक पात्रता देखील तितकीच महत्त्वाची ठरते. 

काही अभिनेत्रींनी परदेशातील नामांकित विद्यापीठांतून शिक्षण घेतले आहे, तर काहींनी अभिनयाची आवड जोपासण्यासाठी शिक्षण अर्धवट सोडले.

दीपिकाने १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने बॅचलर डिग्रीसाठी प्रवेश घेतला होता पण मॉडलींगची आवड जोपासण्यासाठी तिने शिक्षण अर्धवट सोडले. 

आलिया भट्टने १० वी पर्यंतचे शालेय शिक्षण पूर्ण केले, त्यानंतर तिने थेट बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 

कियारा अडवाणीने आपले बॅचलर डिग्रीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तिने मास कम्युनिकेशन या विषयांत आपले ग्रॅज्यूएशन पूर्ण केले. 

क्रिती सेनॉन हिने इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनियरिंग मध्ये आपली बॅचलर डिग्री पूर्ण केली आहे. 

श्रद्धा कपूर बॉस्टन युनिव्हर्सिटी, यूएसए इथून सायकोलॉजी विषयांत शिक्षण घेत होती, पण अभिनयासाठी तिने शिक्षण अर्धवट सोडले.

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिने सेंट झेवियर्स कॉलेजमधून समाजशास्त्र विषयात पदवी (बी.ए.) मिळवली आहे. त्यानंतर तिने मास्टर्सचे शिक्षण देखील पूर्ण केले. 

तापसी पन्नू हिने दिल्लीतील गुरु तेग बहादुर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनीअरिंग (बी.टेक) पदवी प्राप्त केली आहे.

परिणीती चोप्रा हिने मँचेस्टर बिझनेस स्कूलमधून बिझनेस, फायनान्स आणि इकॉनॉमिक्स या विषयांमध्ये ट्रिपल ऑनर्स पदवी घेतली आहे.

Click Here