चित्रपटांमधून तयार झालेले हे फॅशन ट्रेंड आजही लोकांच्या मनात घर करून आहेत.
एखाद्या चित्रपटातील पात्राची स्टाईल, साडी, मेकअप, हेअरस्टाईल किंवा अगदी शूजही इतके प्रसिद्ध होतात की संपूर्ण देशभरात त्याचा ट्रेंड बनतो.
स्टाईल आयकॉन बनलेले लुक्स, जे चित्रपटांइतकेच आपल्या ड्रेसिंगवरही ठसा उमटवून गेले...
‘चांदनी’ चित्रपटातील श्रीदेवीच्या प्लेन शिफॉन साड्यांमुळे मार्केटमध्ये शिफॉन साड्यांची बंपर मागणी वाढवली.
कभी ख़ुशी कभी ग़म चित्रपटांतील करीना कपूरची ड्रेसिंग स्टाईल हिट झाली, बॅकलेस टॉप, शरारा आणि कॉलेज लुकने तरुणींच्या फॅशनमध्ये बदल घडवला.
जब वी मेट चित्रपटांतील करीना कपूरचा टी‑शर्ट–सलवार लूक बराच काळ फेमस झाला. अनेकांनी त्या स्टाइलची नक्कल केली.
ऐश्वर्या रायच्या जोधा अकबर चित्रपटांतील ड्रेसिंग स्टाईलमुळे हेवी ज्वेलरी आणि राजस्थानी/मुघल स्टाइलमुळे ब्राइडल फॅशनवर मोठा प्रभाव पडला.
दीपिका पादुकोणच्या कॉकटेल चित्रपटांमुळे फ्रंट‑टाय टॅंक टॉप, अल्ट्रा‑मिनी शॉर्ट्स आणि बोहो स्टाईलचे पार्टी ड्रेस फारच फेमस झाले होते.
ये जवानी है दीवानी चित्रपटातील दीपिकाच्या भूमिकेमुळे डिनिम स्कर्ट, स्ट्राइप्ड टी‑शर्ट आणि शीमर साड्यांचा लुक फारच लोकप्रिय झाला.
२ स्टेट्स चित्रपटांतील आलिया भट्टच्या चंदेरी कुर्ता, जीन्स, कॉटन स्कर्ट, स्लीव्हलेस टॉप, कांजीवरम साड्यांनी कॉलेज गर्ल्सवर वेगळाच ठसा उमटवला.
दीपिकाच्या पीकू चित्रपटामुळे कुर्ता‑प्लाझो कॉम्बिनेशन, काजल–बिंदी लुकने ऑफिस‑गोइंग महिलांमध्ये सोप्या पण सुटसुटीत लुक्सचा ट्रेंड तयार झाला.
बाजीराव मस्तानी मधील दीपिका–रणवीरच्या लंहगा‑ शरारा यांसारख्या ड्रेसिंग स्टाईलमुळे पारंपरिक पोशाखांना नवे रूप मिळाले .