रबर बॅण्डचे ६ उपयोग, किचनमधील काम होतील झटपट... 

रबर बॅण्ड आपल्या नेहमीच्या वापरातील एक खास वस्तू. 

रबर बॅण्डच्या मदतीने आपण केस बांधतो, परंतु याशिवाय देखील रबर बॅण्डचे अनेक उपयोग आहेत. 

रबर बॅण्डच्या मदतीने आपण किचनमधील अनेक काम देखील पटकन करु शकतो. 

बरणी किंवा बाटलीचे झाकण उघडत नसेल तर त्या झाकणाभोवती रबर बॅण्ड गुंडाळून झाकण उघडावे, यामुळे ग्रीप मिळून झाकण पटकन उघडते. 

चॉपिंग बोर्डच्या दोन्ही बाजूंना रबर बॅण्ड अडकवून घेतल्याने ते सरकत नाही, एकाच जागी पृष्ठभागाला चिकटून राहते. 

किचनमधील बिस्कीट, वेफर्स, मसाल्यांची उघडलेली पाकीट पुन्हा बांधून ठेवण्यासाठी रबर बॅण्ड वापरला जातो. 

भांड्यांमध्ये चमचे उभे ठेवले तर ते आत पडतात, यासाठी चमच्याला रबर बॅण्ड बांधून ठेवावा यामुळे चमचा घसरून पडत नाही. 

भांड्यांच्या हँडलवर रबर बॅण्ड बांधल्याने जड भांडं उचलताना हाताला ग्रीप येते, यामुळे भांडं हातातून सटकून खाली पडत नाही. 

Click Here