वडापावचे ५ प्रकार, कधी खाल्ले का ?

वडापाव आजकाल मिळतो विविध चवींचा. पाहा कोणते प्रकार आहेत. 

वडापाव म्हणजे महाराष्ट्रात राहणाऱ्यांसाठी पोटाचा आधार आहे. जागोजागी वडापावच्या गाड्या पाहायला मिळतात.

छान चविष्ट वडापावचे आजकाल विविध प्रकार बाजारात मिळायला लागले आहेत. तरुणपिढी ते अगदी आवडीने खाते. 

फार लोकप्रिय असलेला प्रकार म्हणजे चीज वडापाव. वड्यात भरपूर चीज भरले जाते. तळताना ते वितळते. पावाला विविध सॉस लावले जातात असा हा वडापाव आजकाल सगळीकडे मिळतो. 

तंदूर हा प्रकार फार प्रसिद्ध आहे. मात्र सध्या तंदूर चहा आणि तंदूर वडापाव हे प्रकार फार लोकप्रिय आहेत. कुरकुरीत तंदूरी वडा जरा महाग विकला जातो तरी लोक आवडीने खातात. 

ऐकायला जरा विचित्र वाटणारा तरी प्रसिद्ध असलेला प्रकार म्हणजे वेफर्स वडापाव. पावाला चटण्या तर लावतातच त्यासोबत वेफर्सही भरतात. 

शेजवान डोसा मध्यंतरी फार लोकप्रिय होता. मात्र सध्या शेजवान वडापावही आहे. शेजवान चटणी लाऊन झणझणीत असा हा पदार्थ केला जातो. 

उलटा वडापाव नावाप्रमाणेच असतो. पावात वड्याचे सारण भरुन पावासकट वडा तळला जातो. पॅटीससारखाच हा पदार्थ आहे. 

Click Here