चहासोबत चुकूनही खाऊ नये 'या' गोष्टी

भारतात चहाचे भरपूर शौकीन आहेत. दिवसाची सुरूवात चहानेच केली जाते.

भारतात चहा केवळ एक पेय नाही तर एक भावना आहे. अनेकदा लोक चहासोबत भजी, बिस्कीट, ब्रेड, टोस्ट, चटकदार पदार्थ खातात.

पण चहासोबत खाल्ल्या जाणाऱ्या या गोष्टींचा आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. अशात चहासोबत काय खाऊ नये हे पाहुयात.

भजी बेसनापासून बनवली जातात आणि तळली जातात. पण जेव्हा आपण ही चहासोबत खातो, तेव्हा लिव्हर कमजोर होतं आणि त्वचा डल होते.

पांढरे ब्रेड मैद्यापासून बनवले जातात. यातून शरीराला पोषण मिळत नाही. ब्रेड चहासोबत खाल तर गॅस, अॅसिडिटी, ब्लोटिंगची समस्या होते.

बरेच लोक चहासोबत टोस्ट खातात. ते कुरकुरीत असल्यानं चांगले लागतात. पण टोस्टमुळे आपलं ब्लड प्रेशर वाढू शकतं. 

चहासोबत चटपटीत काही खाल्ल्यानं तोंड कोरडं होतं आणि जास्त तहान लागते. तसेच ब्लड प्रेशरही वाढतं.

चहा आणि फळं हे कॉम्बिनेशन चुकीचं आहे. चहामधील टॅनिन फळातील पोषक तत्व नष्ट करतं. ज्यामुळे गॅस होऊ शकतो.

चहासोबत नेहमीच जास्त बिस्कीट खात असाल तर वजन वाढतं आणि डायबिटीसचा धोकाही वाढतो. 

Click Here