टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद २००० धावांचा टप्पा गाठणारे भारतीय फलंदाज
साई सुदर्शन टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद २००० धावा पूर्ण पहिला भारतीय आहे.
साई सुदर्शनने एकूण ५३ डावांमध्ये अशी उल्लेखनीय कामगिरी केली.
आयपीएलमध्ये साई सुदर्शन गुजरात टायटन्सकडून खेळतो.
भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने ५९ डावांमध्ये २००० टी-२० धावा पूर्ण केल्या.
या यादीत भारताचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड तिसऱ्या स्थानावर आहे, ज्याने ६० डावांत अशी कामगिरी केली.
देवदत्त पडिक्कलने टी-२० क्रिकेटमधील ६१ डावांमध्ये २००० धावांचा टप्पा ओलांडला.
रजत पाटीदार या यादीत पाचव्या स्थानावर आहे, ज्याने ६१ डावांमध्ये २००० टी-२० धावा पूर्ण केल्या.