चविष्ट आणि पौष्टिक स्मूदी करण्याची रेसिपी. अगदीच सोपी असते पण आरोग्यासाठी चांगली.
चवीला छान आणि पौष्टिक असे पदार्थ नक्की खायला - प्यायला हवे. त्यापैकी एक म्हणजे स्मूदी. लहान मुलांनाही आवडते आणि पोटभरीची असते.
अनेक प्रकारची स्मूदी करता येते. त्यापैकी एक म्हणजे ड्रायफ्रुट स्मूदी. चवीला मस्त लागते आणि करायला अगदी सोपी असते.
साहित्य - काजू, बदाम, खजूर, दूध, मध, केळं, बेदाणे, पिस्ता
एका वाडग्यात थोडे काजू तेवढेच बदाम, चार ते पाच बिया काढलेले खजूर, चार बेदाणे आणि थोडा पिस्ता दुधात भिजत ठेवा.
पंधरा ते वीस मिनिटांनी एका मिक्सरच्या भांड्यात केळ्याचे तुकडे घ्यायचे. त्यात भिजवलेला सुकामेवा घालायचा. दूध घालायचे.
दोन चमचे मध घालायचे. मिक्सर फिरवायचा आणि मस्त एकजीव स्मूदी तयार करायची. छान घट्ट होते आणि चवीला मस्त लागते.