'तू' एक पाऊल पुढे तर टाक...!

नेहमीच तुझी ओळख कोणा न कोणाच्या जाेडलेली आहे. तुला स्वतःची खरी ओळख करून घ्यायची असेल, तर एक साेलाे ट्रिप नक्की कर. एक पाऊल पुढे टाकून तर बघ. 

एकट्याने प्रवास करताना, स्वतःला नव्याने जाणून घेण्याची, स्वतःतल्या क्षमता ओळखण्याची संधी तुला मिळते. 

एकटीने प्रवास केल्याने मनातली भीती कमी हाेते. निर्णयक्षमता सुधारते. स्वतःची एक वेगळी ओळख हाेते. 

तू आत्मनिर्भर आहेस, याची जाणिव तुला स्वतःला हाेते. मानसिक स्वातंत्र्याची जाणिव तुला हाेते. 

सगळं आपण ठरवताे, तसंच हाेत नाही, याची जाणिव, सत्य प्रवासातच अनुभवता येते. 

स्वतःच्या 'कन्फर्ट झाेन'मधून बाहेर पडून एका नव्या जगाची ओळख हाेते, तिथे उभे राहण्याची ताकद मिळते. 

साेलाे ट्रिप प्लॅन करताना, सुरक्षित ठिकाण निवडा. इर्मजन्सी नंबर स्वतःजवळ ठेवा. आड वाटेचे पर्याय निवडणे टाळा. 

गाेवा, पाचगणी, कुर्ग, साताऱ्याचे कास पठार, ऋषिकेश, जयपूर असे पर्याय साेलाे ट्रिपसाठी निवडू शकता. 

Click Here