दात घासणं ही चांगली सवय असली तरी घाईने दात घासल्यास काय होते, जाणून घ्या.
अनेकांना दिवसातून दोन वेळा ब्रश करण्याची सवय असते. पण चुकीच्या वेळी ब्रश केल्याने दात खराब होतात.
आपल्या उलट्या झाल्यानंतर पोटातील आम्ल तोंडात जाते. ज्यामुळे दातांवर मुलामा चढतो. अशावेळी ब्रश केल्याने दात खराब होऊ शकतात.
जेवल्यानंतर दातांचे इनॅमल कमकुवत होतात. त्यामुळे लगेच ब्रश करु नका.
गोड पदार्थ खाल्ल्यानंतर बॅक्टेरिया आपले दात मऊ करतात. ज्यामुळे लगेच ब्रश केल्याने दात कमकुवत होतात.
सगळ्यात आधी पाण्याने गुळणा करा. तासाभरानंतर ब्रश करा.
हिरड्या मऊ असतील तर मऊ ब्रश निवडा. इलेक्ट्रिक ब्रश प्लेक काढून टाकण्यास मदत करतात. मॅन्यूल ब्रश दातांसाठी चांगला असतो.
ब्रश आपल्या दात आणि हिरड्यांच्यामध्ये ठेवा. हलक्या हाताने दात घासा.