World Book Day: पुस्तक लिहिणारे बाॅलीवूड सेलिब्रिटी
कित्येक बॉलीवूड कलाकारांनी स्वत:च्या आयुष्यावर पुस्तक लिहिले आहे. असे लेखक सेलिब्रिटी कोण आहेत ते पाहुया..
ऋषी कपूर यांनी 'खुल्लमखुल्ला' नावाचे पुस्तक लिहिले आहे. यामध्ये त्यांनी त्यांचे करिअर, कौटुंबिक गोष्टी, आयुष्यातले संघर्ष, वाद याविषयी स्पष्टच लिहिलं आहे.
आज हॉलीवूड स्टार असणारी बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिनेही 'Unfinished' नावाचं पुस्तक लिहिलं आहे.
'An Unsuitable Boy' हे करण जोहर लिखित पुस्तकही खूप चर्चेत होतं. त्याच्या रिलेशनशिप्सबद्दल, वैयक्तिक आयुष्य आणि बॉलीवूड याबाबत त्याने या पुस्तकात सविस्तर लिहिलं आहे.
अभिनेत्री ट्विंकल खन्ना ही तर लेखिका आहेच. तिने काही वृत्तपत्रांमधून स्तंभलेखन केलं असून तिची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहे. पण 'Mrs Funnybones' हे तिचं पहिलं पुस्तक होतं.
'Sach Kahun Toh' या पुस्तकातून नीना गुप्ता यांनी त्यांचं करोल बाग येथील लहानपण ते बॉलीवूड करिअरपर्यंतच्या कित्येक गोष्टी लिहिल्या आहेत.