तुम्हीसुद्धा झोपण्यापूर्वी पार्टनरसोबत 'पिलो टॉक' करता का ? 

रात्री झोपण्यापूर्वी जोडीदारासोबत 'पिलो टॉक' करण्याचे अनेक फायदे...

पिलो टॉक म्हणजे, आपल्या जोडीदाराच्या शेजारी निवांत झोपून दिवसभरातील गोष्टी, भावना आणि विचार शांतपणे शेअर करणे.

मनातले विचार बोलून दाखवल्याने तुम्ही एकमेकांशी भावनिकरीत्या जोडले जातात, एकमेकांबद्दल आदर आणि विश्वास वाढतो.

झोपण्यापूर्वी सकारात्मक किंवा नकारात्मक विचार मोकळेपणाने शेअर केल्याने स्ट्रेस आणि चिंता कमी होते. 

पिलो टॉकदरम्यान अनुभवलेले क्षण तुमच्या नात्यातील रोमान्स आणि शारीरिक जवळीक वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतात. 

पिलो टॉक करताना मारलेल्या गप्पांमुळे एकमेकांचे विचार, मतं आणि गरजा नीट समजतात. 

दिवसभरात झालेले छोटे-मोठे गैरसमज किंवा मतभेद रात्री शांतपणे बोलून सोडवता येतात. 

पिलो टॉक म्हणजे फक्त गप्पा मारणे नव्हे तर दोघांमधील इमोशनल बॉंड आणि जवळिक वाढवणारा अत्यंत महत्त्वाचा वेळ आहे.

पिलो टॉक दरम्यान मारलेल्या हलक्या-फुलक्या गप्पांमुळे मन शांत होतं आणि झोप चांगली लागते.

Click Here