पेनकिलर घेतल्यावर वेदना लगेच कशी काय थांबते?

पेनकिलर घेतल्यावर नक्की काय घडतं? वेदना थांबवण्यामागचं नेमकं कारणं... 

कुठेही दुखू लागल की आपण सहजपणे पेनकिलर घेतो आणि काही मिनिटांतच आपल्याला आराम मिळतो.

कधी विचार केला आहे का ? की पेनकिलर लगेचच वेदना कशी कमी करते. 

वेदना मेंदूपर्यंत पोहोचवणारे सिग्नल्स असतात, ही औषधं त्या सिग्नल्सला ब्लॉक करतात.

जेव्हा शरीराला दुखापत होते, तेव्हा पेशी 'प्रोस्टाग्लँडिन' नावाचे रसायन तयार करतात. हे रसायन मेंदूला वेदनेचा संदेश पाठवते.

जेव्हा तुम्ही पेनकिलर घेता, तेव्हा ती रक्तात विरघळते आणि संपूर्ण शरीरात त्याचे औषधी गुणधर्म पोहोचतात. 

पेनकिलर शरीरातील त्या एन्झाइम्सना रोखते जे 'प्रोस्टाग्लँडिन' तयार करतात. रसायने कमी झाली की मेंदूपर्यंत पोहोचणारे सिग्नल्स मंदावतात.

सोप्या भाषेत सांगायचे तर, पेनकिलर वेदनेच्या जागी असरदार ठरतं नाही, तर मेंदूला वेदनेचा अनुभव घेण्यापासून थांबवते.

पेनकिलर तात्पुरता आराम देतात, पण वारंवार आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्या घेणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

Click Here