आरोग्यासाठी वरदान असलेलं पनीर कधी ठरतं घातक?

काही विशिष्ट आजार किंवा शारीरिक तक्रारी असतील तर पनीर खाणं तुमच्यासाठी 'स्लो पॉयझन' ठरू शकतं.

सणासुदीचा बेत असो वा हॉटेलमधील जेवण, पनीरच्या डिशशिवाय बेत पूर्णच होत नाही.

काही विशिष्ट आजार किंवा शारीरिक तक्रारी असतील तर पनीर खाणं तुमच्यासाठी 'स्लो पॉयझन' ठरू शकतं.

जर अपचन, गॅस किंवा ॲसिडिटीचा त्रास वारंवार होत असेल, तर पनीर खाणे टाळा. पनीरमध्ये प्रथिने जास्त असल्याने ते पचायला जड असते.

पनीरमध्ये सोडिअमचे प्रमाण असते. जास्त पनीर खाल्ल्याने शरीरातील सोडिअम वाढून रक्तदाब वाढण्याची भीती असते.

किडनीशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास पनीर खाऊ नये, यातील हाय प्रोटीन किडनीवर ताण देऊ शकतात.

पनीरमध्ये फॅट्सचे प्रमाण जास्त असते. जर तुम्ही वेटलॉस डाएटवर असाल, तर मर्यादित प्रमाणातच पनीर खावं. 

ज्यांना दुग्धजन्य पदार्थांची ॲलर्जी आहे किंवा दूध पचत नाही, त्यांना पनीर खाल्ल्याने जुलाब किंवा उलट्यांचा त्रास होऊ शकतो.

शिळे किंवा खराब पनीर खाल्ल्याने त्यातील बॅक्टेरियामुळे फूड पॉयझनिंग होऊ शकतं यामुळे नेहमी ताजे पनीरच खावे.

Click Here

Your Page!