दीपिका की आलिया? कोण आहे बॉलीवूडची सर्वात श्रीमंत अभिनेत्री...

बॉलीवूडच्या 'या' अभिनेत्रींच्या एकूण संपत्तीचा आकडा ऐकून वाटेल आश्चर्य...

बॉलिवूडमधील काही अभिनेत्री आज भारतातील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींच्या यादीत आघाडीवर आहेत.

विश्वसुंदरी ऐश्वर्या राय अभिनय, आंतरराष्ट्रीय ब्रँड्स आणि लक्झरी गुंतवणुकीमुळे कोट्यवधींची मालकीण, तिची नेटवर्थ साधारण ८०० कोटींहून अधिक आहे.

देसी गर्ल प्रियांका चोप्राने बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अनेक भूमिका गाजवल्या असून तिची संपत्ती ६०० कोटींच्या वर आहे.

तरुण वयातच आलियाने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आणि क्लोदिंग ब्रँड सुरू करून ५५० कोटींहून अधिक साम्राज्य उभं केलंय.

 केवळ एका चित्रपटासाठी कोट्यवधी घेणारी दीपिका ५०० कोटींहून अधिक संपत्तीची मालकीण आहे.

'बेबो' आजही ब्रँड मार्केटमध्ये हिट असून तिची नेटवर्थ ४८५ कोटींच्या आसपास आहे.

स्वतःचा 'Kay Beauty' हा यशस्वी कॉस्मेटिक ब्रँड चालवणाऱ्या कतरिना कैफची २०० कोटींहून अधिक संपत्ती आहे.

अभिनयासोबत प्रोडक्शन हाऊस आणि बिझनेस इन्व्हेस्टमेंटमध्ये गुंतवणूक केल्याने अनुष्का शर्मा २५५ कोटींची मालकीण आहे. 

 रिअ‍ॅलिटी शोजमध्ये जज, ब्रँड एंडोर्समेंट आणि स्वतःची डान्स अकॅडमी चालवणाऱ्या माधुरी दीक्षितची संपत्ती २५५ कोटींपेक्षा जास्त आहे. 

९० च्या दशकापासून प्रेक्षकांना अभिनयाने वेड लावणाऱ्या काजोलची अंदाजे एकूण संपत्ती २३५ कोटी रुपये इतकी आहे.

राणी मुखर्जीची एकूण संपत्ती २०६ कोटी रुपये आहे. जरी ती सध्या मोजक्याच चित्रपटांत दिसत असली, तरी तिची ब्रँड व्हॅल्यू आजही खूप मोठी आहे.

Click Here