केसांना फक्त तेल लावणे पुरेस नसून ते नेमकं कधी आणि कशा पद्धतीने लावावं, यावर त्याचा फायदा अवलंबून असतो.
नारळाच्या तेलाचा जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी ते लावण्याची वेळ खूप महत्त्वाची असते.
केसांना नारळाचे तेल नेमकं कधी लावल्याने त्याचा फायदा दुप्पट होतो ते पाहूयात.
कोरड्या केसांसाठी अंघोळीच्या ३० मिनिटे आधी कोमट नारळाचे तेल लावा. यामुळे शॅम्पू करताना केसांमधील नैसर्गिक ओलावा टिकून राहतो.
जर तुमचे केस खूप गळत असतील, तर रात्री झोपण्यापूर्वी मुळांना तेल लावून हलका मसाज करा. यामुळे केसांना रात्रभर पोषण मिळते.
जर केसांना फाटे फुटले असतील तर फक्त टोकांना थोडे तेल लावा. यामुळे केस खालून कोरडे पडत नाहीत.
केस ओले असताना नारळाचे तेल लावणे टाळा. यामुळे केस अधिक कमकुवत होऊ शकतात आणि धूळ जास्त चिकटते.
शाम्पू केल्यानंतर कंडीशनर म्हणून फक्त थेंबभर तेल हातावर चोळून केसांना लावा. यामुळे केसांना नॅचरल चमक येते.
केसांना आठवड्यातून फक्त २ वेळा तेल लावण पुरेस आहे, जास्त तेल लावल्याने स्काल्पची छिद्रे बंद होऊ शकतात.