चुकीच्या वेळी घातलेल मीठ पदार्थांची चव बिघडवू शकते, यासाठी कोणत्या पदार्थांत नेमकं कधी मीठ घालावे ते पाहा.
मीठ 'किती' घालावे यापेक्षा ते 'कधी' घालावे, यावर तुमच्या जेवणाची खरी चव अवलंबून असते.
इडली - डोसा बॅटर आंबवण्याआधी मीठ घालू नका, बॅटर आंबल्यानंतरच मीठ घाला त्यामुळे बॅटर नीट फुलते.
भाज्या अर्धवट शिजल्यावरच मीठ घाला, चव टिकते. आधी मीठ घातल्यास भाजीला पाणी सुटते.
कच्च्या डाळीत मीठ घालू नका, डाळ शिजल्यानंतर किंवा फोडणीत मीठ घाला. डाळ व्यवस्थित शिजते चव संतुलित राहते.
पाणी उकळायला लागल्यावरच तांदुळात मीठ घाला. भात मोकळा शिजतो आणि चव एकसारखीच लागते.
कांदा लवकर मऊ करायचा असेल, तर तो तेलात टाकल्यावर लगेच चिमूटभर मीठ घाला. यामुळे कांद्यातील पाणी सुटून तो लवकर शिजतो.
पालेभाज्या शिजवताना शेवटी मीठ घालावे. सुरुवातीला मीठ घातल्यास भाज्यांचा हिरवा रंग काळपट पडू शकतो.
सॅलॅड कापून ठेवल्यावर लगेच मीठ घालू नका. खायच्या वेळी मीठ घातल्यास भाज्यांचा कुरकुरीतपणा कायम राहतो.
पोळी - पराठ्याचे कणीक मळताना सुरुवातीलाच मीठ घाला, चव एकसारखी राहते.
सूप आणि रस्सा भाजीत सगळ्यांत शेवटी मीठ घाला, चव अचूक लागते.