मोदकांची उकड उरली, करा ५ चविष्ट पदार्थ... 

उकडीच्या मोदकांची उकड उरली तर त्याचे करता येतील असे चविष्ट पदार्थ कोणते ते पहा...

उकड ही आधीच शिजलेली असल्यामुळे या पदार्थांना जास्त वेळ लागत नाही. 

उकडीत थोडे तिखट, मीठ, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, जिरे व थोडे तिळ टाकून थालीपीठ बनवा. तूप किंवा लोण्यासोबत खायला खूप छान लागते.

उरलेल्या उकडीमध्ये थोडे पाणी, मीठ आणि जिरे घालून पातळ मिश्रण तयार करा. हे मिश्रण गरम तव्यावर थोडे तेल घालून घावन करा. 

उकडीत कांदा, मसाला घालून कणकेचे गोळे लाटून पराठे देखील तयार करु शकता. 

उकड उरली तर त्यापासून आपण तांदुळाची गरमागरम भाकरी देखील तयार करुन खाऊ शकता. 

उकडीचे लहान गोळे घेऊन ते पुरीसारखे लाटून त्यात मोदकाचे सारण भरा. तव्यावर तेल, तूप घालून पराठ्यासारखे भाजून घ्या. 

या सर्व पदार्थांमुळे उरलेली उकड वाया जाणार नाही आणि तुम्हाला वेगवेगळ्या पदार्थांची चवही घेता येईल.

Click Here