अनेकदा जेवण बनवताना आपला हात भाजतो, अशावेळी काय करावं? जाणून घ्या.
भाजल्यानंतर अनेकदा आपण टूथपेस्ट, हळद किंवा तेल लावतो. पण भाजलेल्या जागी या गोष्टी लावू नका.
भाजल्यानंतर सगळ्यात आधी ती जागा थंड पाण्याने कमीत कमी ५ मिनिटे धुवा.
ज्यामुळे भाजलेली जागा थंड होईल आणि जळजळ कमी होईल.
भाजलेल्या ठिकाणी कधीही बर्फ लावू नका, यामुळे जखम आणखी चिघळू शकते.
यानंतर जळलेला भाग स्वच्छ करा. भाजलेल्या ठिकाणी कपडे किंवा दागिने घातलेले असतील ते काढा.
यावर स्वच्छ पट्टी लावा, ज्यामुळे संसर्ग होणार नाही.
जर जखम मोठ्या प्रमाणात असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.