चुकीच्या पद्धतीने पिणं पडू शकतं महागात
आरोग्यासाठी पाणी खूप महत्त्वाचं आहे. मात्र योग्य पद्धतीने पाणी पिणं अत्यंत गरजेच आहे.
उभं राहून पाणी प्यायल्याने शरीरातील फ्लूइड बॅलेन्स बिघडतो. त्यामुळे नेहमी खाली नीट बसून पाणी प्या.
पाणी नेहमी हळूहळू प्यावं. छोटे-छोटे घोट घेतल्याने शरीराला पोषक तत्वं आणि मिनरल्स योग्यरित्या मिळतात.
गरम पाण्याने दिवसाची सुरुवात करा, यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते.
पचनक्रिया नीट होते. मेटाबॉलिज्म वेगाने होतं, ज्यामुळे वजन कमी करण्यासही मदत होते.
आयुर्वेदानुसार, जेवताना पाणी पिऊ नये. जेवणाच्या आधी आणि नंतर एक तासाने तुम्ही पाणी पिऊ शकता.