फिट राहायचंय... मग फॉलो करा हा सोपा नियम
सोशल मीडियावर '6-6-6 वॉकिंग रूल' अत्यंत लोकप्रिय होत आहे. रोज चालण्याची ही अतिशय सोपी पद्धत आहे.
6-6-6 चा अर्थ असा आहे की, तुम्ही दिवसातून थोडा वेळ चालावं, जेणेकरून तुमचे शरीर एक्टिव्ह राहील आणि मेटाबॉलिझम सुधारेल.
तुम्हाला एका वेळी फक्त ६ मिनिटं चालायचं आहे. दिवसभरात अशा प्रकारे ६ वेळा ६-६ मिनिटांच्या छोट्या फेऱ्या मारायच्या आहेत.
आठवड्यातून किमान ६ दिवस हे रूटीन पाळायचं आहे. यामुळे तुमच्या शरीराला एक शिस्त लागते आणि व्यायामाचा फायदा होतो.
ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते, हृदयाचं आरोग्य सुधारतं, वजन कमी करणं सोपं जातं आणि एनर्जी वाढते.
जे लोक बराच वेळ लॅपटॉपवर किंवा ऑफिस डेस्कवर बसून काम करतात, त्यांच्यासाठी हा रूल सर्वात उत्तम आहे.