चुकीच्या पदार्थांसोबत दूध प्यायल्यावर आरोग्याला हानी होऊ शकते.
दूध हे कॅल्शियमचा चांगला स्त्रोत मानले जाते. हे आरोग्यासाठी आणि हाडांसाठी खूप फायदेशीर आहे.
दुधात प्रथिने, लॅक्टोज आणि जीवनसत्त्व असतात. जर हे चुकीच्या पद्धतीने प्यायल्यास आरोग्याला हानी होऊ शकते.
थंड दूध रेफ्रिजरेटमधून काढल्यानंतर लगेच पिऊ नका. गरम करुन प्यावे.
चीज खात असाल तर दूध पिणे टाळा. अपचनाचा त्रास होईल.
दूध आणि दह्याचे मिश्रण आपले पोट खराब करु शकते.
दूध कधीही आंबट पदार्थांसोबत खाऊ नका. सायट्रिक अॅसिडने समृद्ध असलेली ही फळे आरोग्याला हानी पोहोचवतात.
दूध आणि मासे खाणे देखील आरोग्यासाठी हानिकारक आहे.