वेळीच व्हा सावध अन् घ्या आरोग्याची काळजी
कॅन्सर हा एक गंभीर आजार असून ज्यामध्ये शरीरातील पेशींची अनियंत्रितपणे वाढ होते.
कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत. हा आजार कोणालाही होऊ शकतो. मात्र काहींना याचा धोका इतरांच्या तुलनेत जास्त असतो.
जेनेटिक फॅक्टर असलेल्या लोकांना कॅन्सर होण्याची शक्यता सर्वात जास्त आहे.
ब्रेस्ट, लंग्स आणि कोलन कॅन्सर हा अनेकदा अनुवंशिक असू शकतो.
स्मोकिंग करणाऱ्यांना आणि दारू पिणाऱ्यांना कॅन्सरचा सर्वाधिक धोका आहे.
इम्यून सिस्टम कमकुवत असलेल्या आणि चुकीची लाईफस्टाईल जगत असलेल्या लोकांना कॅन्सर होऊ शकतो.