लटकन प्रकारातले कानातले तरुण मुलींना खूप आवडतात.
सध्या लग्नसराईनिमित्त तर अशा कानातल्यांना विशेष मागणी आहे. असे एखादे डिझाईन आपल्या कलेक्शनमध्ये हवेच.
लटकन कानातल्यांचं वैशिष्ट्य असं की ते साडीवर जसे छान दिसतात तसेच ते घागरा आणि पंजाबी ड्रेसवरही शोभून दिसतात.
अगदी २ ते ३ ग्रॅम सोन्यामध्ये असे सुंदर लटकन कानातले मिळू शकतात.
१ ग्रॅम गोल्डमध्येही लटकन कानातल्यांचे कित्येक प्रकार उपलब्ध आहेत.
तुम्ही असे कानातले तुमच्या शहरातल्या बाजारपेठेतून किंवा मग ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही घेऊ शकता.