गौरी गणपतीचा सण म्हटला की वस्त्रमाळा आल्याच.. आता त्याच वस्त्रमाळांचे हे काही सुंदर प्रकार पाहा..
नेहमीच्या पारंपरिक वस्त्रमाळांपेक्षा अशा माळ जास्त आकर्षक दिसतात.
हे एक सुंदर डिझाईन. यामुळे गौरी गणपतीच्या मुर्ती जास्त खुलून दिसतील यात शंकाच नाही.
वर टपोरी फुलं असणारी ही वस्त्रमाळ पाहताक्षणीच आवडणारी आहे.
गणपती मोठ्या आकाराचा असेल तर त्याच्यासाठीची वस्त्रमाळही अशीच ठसठशीत हवी.
गौरींना जर या वस्त्रमाळा घातल्या तर त्यांच्या अंगावर एखादा दागिना घातल्याप्रमाणेच त्या खुलून दिसतील.
तीनपदरी वस्त्रमाळांचा हा एक सुंदर प्रकार पाहा.
ही वस्त्रमाळ म्हणजे जणुकाही गौरी गणपतींच्या अंगावर घातलेला एखादा पदक असणारा दोन पदरी दागिनाच..