भुईमुगाच्या शेंगांच्या टरफलांचे ७ भन्नाट उपयोग, कधी ऐकलेच नसतील... 

भुईमुगाच्या शेंगा खाल्ल्यानंतर आपण त्याची टरफल फेकून देतो, पण हीच टरफल अनेक प्रकारे उपयोगी पडू शकतात.

भुईमुगाच्या टरफलीचे भन्नाट उपयोग, जे तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करतील.

भुईमुगाची टरफले बागेतील रोपांसाठी उत्तम खताचे काम करतात. यामुळे मातीची गुणवत्ता सुधारते आणि झाडांची वाढ चांगली होते. 

रोपांसाठी मल्चिंग म्हणून उपयोग करावा. कुंडीत झाडांभोवती टरफल घातल्यास माती ओलसर राहते, तण उगवत नाही. 

टरफल जाळून तयार झालेली राख भांडी स्वच्छ करण्यासाठी, भांड्यांवरील तेलकट डाग काढण्यासाठी उपयोगी ठरतात. 

टरफलांमध्ये नैसर्गिकरीत्या कार्बनचे प्रमाण जास्त असते. कंपोस्ट खत बनवताना ती इतर ओल्या कचऱ्यात मिसळल्यास उत्तम सेंद्रिय खत तयार होते.

टरफलांची बारीक पूड करून ती तेलात मिसळून त्याचा लेप फुटलेल्या टाचांवर लावल्यास आराम मिळतो. 

टरफलांची बारीक पूड पाण्यांत मिसळून त्याची फवारणी रोपांवर केल्यास, रोपाला किड लागतात नाही तसेच रासायनिक औषधांची गरज भासत नाही.

Click Here