प्रसिद्ध आहारतज्ज्ञ म्हणतात किडनीसाठी हळद धोकादायक आहे. याविषयी जाणून घेऊया सविस्तर
मसाल्यांमध्ये हळदीला सर्वात महत्त्वाचे स्थान देण्यात आलं आहे. पदार्थांची चव वाढवण्याशिवाय अनेक आजारांवर हळद बहुगुणी ठरते.
हळदीमुळे किडनीचे कार्य सुरळीत होते. यात अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. परंतु हळदीचा आपल्या किडनीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
आहारातज्ज्ञ कनिका मल्होत्रा यांनी एका मुलाखतीदरम्यान हळद आपल्या किडनीवर कसा नकारात्मक परिणाम करते याविषयी सांगितलं.
त्या म्हणतात आपल्या दैनंदिन जेवणात वापरल्या जाणाऱ्या हळदीमुळे आरोग्यावर काही परिणाम होत नाही.
हळदीमध्ये कर्क्यूमिन असते जे लघवीमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण वाढवू शकते. यामुळे स्टोनचा त्रास वाढते.
हळद जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरातील रक्त पातळ होते. रक्त पातळ करण्यासाठी औषधे खाण्याऱ्या लोकांसाठी हे हानिकारक असू शकते.
किडनी स्टोनची औषधे घेणाऱ्या लोकांना हळदीचे सेवन प्रमाणात करायला हवे, यामुळे धोका वाढू शकतो.
डॉक्टर सांगतात शरीराच्या इतर कोणत्याही समस्यांसाठी हळदीच्या गोळ्या घेत असाल तर लेबलवर दिलेल्या सल्ल्यानुसार डोस घ्या.
डॉक्टर कनिका सांगतात ५०० ते २००० मिलीग्राम हळदीच्या औषधांचा डोस घेता येतो. पण त्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.