श्रावणात ट्रेडिशनल ड्रेस, साड्या याबरोबरच इंडो वेस्टर्न कॉम्बिनेशन करून हटके ट्रेंडी गेटअप करून तुम्ही चारचौघात उठून दिसू शकता.
श्रावणात वेगळ्या लुकसाठी चंद्रकोर नक्की ट्राय करा. तुमच्या आवडीप्रमाणे लहान, मोठ्या आकाराची चंद्रकोर टिकली निवडा.
टपोऱ्या मोत्याच्या कुड्यांमुळे तुम्हाला क्लासिक लुक मिळेल. नेहमीच्या ड्रेसला कुड्यांमुळे जास्त उठाव येईल.
एखाद दिवशी डार्क रंगाच्या प्लेन कुडत्यावर मोठं पेंडेंट असणारा तन्मणी नक्की ट्राय करून बघा. रॉयल लुक येईल.
श्रावणातल्या मंगळवारी किंवा शुक्रवारी नेहमीच्या ड्रेस, कुडत्यावर हिरव्या बांगड्या किंवा मोत्याच्या बांगड्या घाला.
लांब केस असतील तर पाचपेढी वेणी, आंबाड्यावर गजरा माळा किंवा गुलाब, चाफ्याचे फुल घाला. लहान केस असले तरी बन लावून गजरा माळू शकता.
एका वेगळ्या लुकसाठी रोजच्या लहान मंगळसुत्राऐवजी मोठे मंगळसूत्र घाला. मोठे पेंडेंट, नथीचे मंगळसूत्र घातल्यावर उठावदार लुक नक्की मिळेल.
श्रावण महिन्यात पुरुष मंडळी चापाची भिकबाळी घालून नवीन ट्रेंडी लुक ट्राय करू शकतात.
श्रावण सोमवारी पांढऱ्या शर्टवर केशरी गंधाचा टिळा लावा आणि हातात रुद्राक्षाचे ब्रेसलेट घाला, तुमची छाप पडेल हे नक्की!