मैद्याऐवजी आहारात कोणत्या पौष्टिक पीठांचा समावेश करु शकतो, ते पाहा...
मैदा हा शरीरासाठी पोषणशून्यच असतो, मैद्यामुळे पचन बिघडते, वजन वाढते आणि साखरही नियंत्रणाबाहेर जाऊ शकते.
गव्हाचे पीठ हे फायबर आणि पोषणयुक्त असते. हे पीठ पचनास योग्य आणि पोट बराचवेळ भरलेलं राहण्यास मदत करते.
बेसन पीठ हे भरपूर प्रथिनयुक्त आणि पचायला हलकं असल्याने आपण मैद्याऐवजी बेसन पिठाचा वापर करु शकतो.
मैद्याला पर्याय म्हणून कॅल्शियमयुक्त नाचणीचं पीठ वापरणं हे आरोग्यासाठी अमृतसमान ठरू शकतं.
ग्लूटेन-फ्री, वजन कमी करणाऱ्यांसाठी उत्तम. उपवासातसुद्धा खाल्लं जातं आणि पचायला हलकं असं ज्वारीचं पीठ देखील फायदेशीर ठरु शकत.
बाजरीचं पीठ फायबरयुक्त आणि हृदयासाठी उत्तम मानलं जात, त्यामुळे आपण मैद्याऐवजी बाजरीचं पीठ देखील वापरु शकता.
हृदयासाठी चांगलं, कोलेस्ट्रॉल कमी करतं, डाएट करणाऱ्यांसाठी सर्वोत्तम पर्याय असं ओट्सचं पीठ देखील वापरु शकता.