नाकावरील हट्टी ब्लॅकहेड्स घालवण्याचे ७ घरगुती उपाय... 

नाकावरील हट्टी ब्लॅकहेड्स काढण्यासाठी तुम्हाला महागड्या ब्यूटी ट्रिटमेंट्सची गरज नाही.

नाकावर जमा झालेले ब्लॅकहेड्स आपला सगळा लूक बिघडवून टाकतात.

नाकावरील हट्टी ब्लॅकहेड्स काढण्यासाठी तुम्हाला महागड्या ब्युटी ट्रिटमेंट्सची गरज नाही. 

स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या नैसर्गिक पदार्थांच्या मदतीने आपण घरच्याघरीच ब्लॅकहेड्स झटपट काढू शकता. 

बेकिंग सोडा व पाणी यांची पेस्ट ब्लॅकहेड्सवर लावून मसाज केल्यास ब्लॅकहेड्स सहज निघतात. 

मध आणि दालचिनीची पूड एकत्रित करुन ब्लॅकहेड्सवर लावून सर्क्युलर मोशनमध्ये फिरवून मसाज केल्यास ब्लॅकहेड्स कमी होतात. 

लिंबाचा रस, साखर आणि मध यांच्या मिश्रणाने थेट ब्लॅकहेड्सवर मसाज केल्यास ब्लॅकहेड्सचे प्रमाण कमी होते. 

मुलतानी माती व गुलाब पाणी यांची पेस्ट नाकावर लावून ती सुकल्यावर स्वच्छ धुवा, यामुळे ब्लॅकहेड्सचे प्रमाण कमी होते. 

ओट्स व दही मिसळून त्याच्या पेस्टने नाकावर स्क्रब करुन घ्यावे, यामुळे ब्लॅकहेड्स काढण्यास मदत होते. 

 ग्रीन टी ची पेस्ट तयार करून थेट ब्लॅकहेड्सवर लावावी, यामुळे नाकावरील हट्टी ब्लॅकहेड्स सहज काढता येतात. 

टोमॅटो नाकावरील ब्लॅकहेड्सवर हलकेच रगडून घ्यावा, यामुळे नाकावरील हट्टी ब्लॅकहेड्सचे प्रमाण कमी होते.

Click Here