बनारसी साडीची चमक कधीच जाणार नाही, पाहा ८ सिक्रेट टिप्स... 

बनारसी साडी म्हणजे फक्त वस्त्र नाही, तर पिढ्यानपिढ्या जपलेला एक मौल्यवान वारसा - ठेवा आहे.

पिढ्यानपिढ्या जपत आलेल्या बनारसी साडीची योग्य निगा राखण्यासाठी काही खास टिप्स माहित असणं अत्यंत गरजेचं आहे.

साडी प्लास्टिकऐवजी सूती किंवा मलमलच्या कापडात गुंडाळून ठेवल्यास साडीच रेशीम सुरक्षित राहतं.

बनारसी साडीवर थेट सूर्यप्रकाश पडू देऊ नका, यामुळे रंग फिकट होण्याचा धोका असतो.

एकाच घडीत ठेवल्यास कडा खराब होऊ शकतात, म्हणून साडीची घडी वेळोवेळी बदला.

साडी ठेवलेल्या कपाटात ओलावा नसावा. साडीला कसर लागू नये म्हणून सुका कडुलिंबाचा पाला किंवा लवंग-काळीमिरीचे मिश्रण मलमलच्या पुडीत बांधून ठेवा.

नेहमी उलट बाजूने आणि कमी तापमान ठेवून साडीला इस्त्री करा, शक्य असल्यास कापड ठेवून मगच इस्त्री करा.

परफ्यूम किंवा डिओ थेट साडीवर मारल्यास जरतारी काम खराब होऊ शकतं, त्यामुळे परफ्यूम किंवा डिओ मारणं टाळा. 

साडी कधीही हँगरवर लटकवून ठेवू नका. साडी नेहमी मलमलच्या कापडात किंवा सुती कपड्यात गुंडाळून ठेवा.

साडी नेहमी ड्राय क्लीन करावी. पहिले तीन-चार वेळा ड्राय क्लीनिंग केल्यास धाग्यांची पकड मजबूत होते आणि जरीची चमक टिकून राहते.

Click Here