कुकरच्या शिट्टीमधून पाणी येऊ नये म्हणून ७ टिप्स...
बऱ्याचदा कुकरच्या शिट्टीतून पाणी किंवा अन्नकण बाहेर येतात आणि स्वयंपाकाचा गॅस आणि ओटा खराब होतो.
वारंवार कुकरच्या शिट्टीमधून पाणी बाहेर येणे हे केवळ त्रासदायकच नाही तर धोकादायकही ठरू शकतं.
जे अन्नपदार्थ शिजवायचे आहे त्यासाठी आवश्यक तेवढेच पाणी वापरा. डाळ किंवा भातासाठी खूप जास्त पाणी वापरल्यास, ते उकळून फेस येतो आणि तो फेस शिट्टीच्या वाटे बाहेर येतो.
कुकरमध्ये शिजवण्यासाठी डाळ किंवा तांदूळ टाकल्यावर त्यात अर्धा ते एक चमचा तेल किंवा तूप घाला. यामुळे शिट्टीमधून पाणी बाहेर येत नाही.
कुकरमध्ये शिजणाऱ्या पदार्थात एक स्टीलचा चमचा किंवा छोटी वाटी ठेवल्यास पाणी वर उसळून शिट्टीपर्यंत जात नाही.
झाकणातील गॅस्केट सैल झालं तर पाणी बाहेर येतं, त्यामुळे ते वेळोवेळी बदलत राहा.
सुरुवातीला गॅस मोठा ठेवला तरी पहिली शिट्टी झाल्यावर लगेच आच मंद करा, म्हणजे शिट्टीमधून पाणी बाहेर येणार नाही.
कुकरचे झाकण लावण्यापूर्वी, शिट्टी व्यवस्थित बसली आहे की नाही आणि तिच्या व्हेंट पाईपमध्ये काही अडकले नाही ना, हे तपासा.
डाळ, कडधान्ये किंवा तांदूळ कुकरमध्ये टाकण्यापूर्वी चांगले स्वच्छ धुवा. आणि थोड्यावेळासाठी पाण्यांत भिजवून ठेवा.