भारतीय मुलींची उंची बेताची असते, फार तर ४ ते ५.५ फूट, तरीही साडीत उंच आणि बारीक दिसण्याचा अट्टहास असतो, त्यासाठी ट्रिक्स!
उंची आणि सुदृढ देहयष्टी असेल तर साडी खुलून दिसते, असा लोकमानस आहे, पण या पद्धतीने साडी नेसली तर कमी उंचीतही दोन्ही गोष्टी साधता येतील.
शिफॉन, जॉर्जेट, सिल्क साड्यांचा वापर करा, त्या अंगावर छान बसतात आणि फिगर रेखीव दिसण्यास मदत करतात.
जाड काठाच्या साड्या तशाही आता ट्रेंड मध्ये नाहीत, त्यापेक्षा बारीक काठाच्या, नाजूक लेसची बॉर्डर असलेली साडी निवडा.
गडद रंगाच्या साड्यांची निवड करा, गडद रंगामध्ये तुम्ही जाड असलात तरी बारीक दिसता.
साडी जेवढी चापून चुपून नेसाल, तेवढे तुम्ही आकर्षक, बारीक आणि उंच दिसाल.
साडीवर बेल्ट लावण्याचाही ट्रेंड सुरु आहे, त्यामुळे तुमची कंबर आटोक्यात दिसते आणि फिगर आकर्षक दिसते.
भरगच्च प्रिंट वाली साडी निवडू नका, सुटसुटीत, आकर्षक साडी निवडा, ज्यामुळे व्यक्तिमत्त्व खुलून येते.
तुमची उंची अगदीच कमी असेल तर हिल्स सॅन्डल किंवा चप्पल घालून मग साडी नेसायला घ्या, त्यामुळे उंची कमी वाटणार नाही.
ब्लाउज फिटिंग परफेक्ट असेल आणि स्टायलिश असेल तर साडीचा पेहराव आणखी खुलून येतो, त्यामुळे योग्य आणि फिटिंगचे ब्लाउज निवडा.
खांदे पसरट असतील तर पदर पिनअप न करता मोकळा सोडा आणि निऱ्या व्यवस्थित करून घ्या. साडी बहारदार दिसते.