थायरॉईड कॅन्सरची लक्षणे कोणती? 

घसा दुखणे, मानेवर गाठ, आवाजात बदल होणं हे गंभीर आजाराचे लक्षण आहे. 

थायरॉईड कर्करोग हा गंभीर आजार आहे. जो थायरॉईड ग्रंथीपासून सुरु होतो. लहान फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी घशात विकसित होऊन हार्मोन्स तयार करते. 

थायरॉईड कर्करोगाचे लक्षण म्हणजे मानेमध्ये गाठ असणे. या गाठीमुळे वेदना होत नाहीत परंतु, घशात हळूहळू वाढ होते. 

घशात दुखणे हे थायरॉईड कर्करोगाचे लक्षण आहे. ही वेदना हळूहळू मानेच्या सर्व भागात पसरते. 

थायरॉईड कर्करोगामध्ये आवाजात बदल जाणवतो. कधीकधी आवाज जड देखील होतो. 

खाण्यापिण्यास किंवा गिळण्यास त्रास होत असेल किंवा वेदना होत असतील तर हे कर्करोगाचे लक्षण आहे. 

श्वास घेण्यास अडचण येणे हे देखील थायरॉईड कर्करोगाचे लक्षण असू शकते. ज्यामुळे श्वसननलिकेवर दबाव येतो. 

यामध्ये व्यक्तीच्या मानेला सूज येते आणि लिम्फ नोड्स वाढतात. 

अचानक वजन कमी होऊन चयापचय प्रक्रियेवर परिणाम होतो. 

Click Here