उंच आणि आकर्षक व्यक्तिमत्वामुळे या काही बॉलिवूड अभिनेत्रींची पडद्यावर एक वेगळीच छाप पडते.
बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत, पण काही अभिनेत्री त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या उंचीमुळेही चर्चेत असतात.
अशाच ८ बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊया, ज्यांची उंची सर्वात जास्त आहे.
मॉडेलिंगमधून बॉलिवूडमध्ये आलेल्या डायना पेंटीची उंची ५ फूट १० इंच आहे, ती तिची उंची आणि एलिगंट स्टाईलसाठी ओळखली जाते.
सौंदर्य आणि ग्रेसफुल व्यक्तिमत्व असलेल्या सोनाली बेंद्रेची उंची ५ फूट ९ इंच इतकी आहे.
बॉलिवूडमध्ये एंट्री करताना नरगिस फाखरी हिच्या सौंदर्याइतकंच तिच्या उंचीचं देखील कौतुक झालं. तिची उंची ५ फूट ९ इंच इतकी आहे.
दीपिका पदुकोण ही बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी आणि उंच अभिनेत्रींपैकी एक आहे. तिची उंची ५ फूट ९ इंच इतकी आहे.
दीपिकाप्रमाणेच अनुष्का शर्माचीही उंची ५ फूट ९ इंच इतकी आहे. तिच्या उंच फिगरमुळे ती कोणत्याही आऊटफिटमध्ये खूप छान दिसते.
क्रिती सेनन तिच्या उंचीमुळे आणि फिटनेसमुळे ओळखली जाते. तिची उंची ५ फूट ८ इंच इतकी आहे.
मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन ही तिच्या उंची आणि व्यक्तिमत्त्वासाठी प्रसिद्ध आहे. तिची उंची जवळपास ५ फूट ९.५ इंच आहे.
सोनाक्षी सिन्हाने 'दबंग' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिची उंची ५ फूट ७ इंच आहे.