बॉलिवूडमधील माय-लेकींच्या जोड्या हुबेहूब दिसतात एकमेकींसारख्याच... 

बॉलिवूड मधील काही अभिनेत्री तर इतक्या हुबेहूब त्यांच्या सेलिब्रिटी आईंसारख्याच दिसतात.

बॉलिवूड मधील काही अभिनेत्रींनी फक्त आईच्याच अभिनयाचाच वारसा घेतला नाही, तर त्यांचे रूपही हुबेहूब त्यांच्या सेलिब्रिटी आईसारखेच आहे.

सारा अली खानचा चेहरा हुबेहूब तिची आई अमृता सिंग यांच्यासारखाच दिसतो. तिचे डोळे आणि बोलण्याची पद्धतही आईशी मिळतीजुळती आहे.

जान्हवी कपूरमध्ये अनेकदा दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची झलक पाहायला मिळते. विशेषतः साडीमधील तिचे लूक पाहून चाहत्यांना श्रीदेवींची आठवण येते.

सोहा अली खानचे नैसर्गिक सौंदर्य आणि तिची ठेवण हुबेहूब तिची आई शर्मिला टागोर यांच्यासारखीच आहे.

 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी आणि त्यांची मोठी मुलगी इशा देओल यांच्यात कमालीचे साम्य आहे. हसताना इशा अगदी आईसारखीच दिसते.

ट्विंकल खन्नामध्ये आई डिंपल कपाडिया यांचे हसू, चेहऱ्याची ठेवण आणि बोल्ड व्यक्तिमत्त्व आजही दिसून येते.

आलिया भट्टचा चेहरा आणि हसू तिची आई सोनी राजदान त्यांची आठवण करून देतात. दोघींचे एक्सप्रेशन्सही खूपच सारखे आहेत.

आई शिवांगी कोल्हापुरे आणि लेक श्रद्धा कपूरचे निरागस सौंदर्य, डोळे आणि हसरा, नाजूक चेहरा तिच्या आईशी खूप मिळताजुळता वाटतो.

Click Here

Your Page!