सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिण्याची चूक करू नका, होईल नुकसान...

उपाशी पोटी लिंबू पाणी पिण्याचे नुकसान आणि ते कोणी पिणे टाळावे ते पाहूयात. 


सकाळी उठल्यावर लिंबू पाणी पिणे हे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते, पण प्रत्येकासाठीच हे फायदेशीर नसते. अतिवापर किंवा चुकीच्या पद्धतीमुळे याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

वेटलॉस, शरीर डिटॉक्स करणे आणि पचन सुधारण्यासाठी अनेकजण हा उपाय रोज करतात.

उपाशी पोटी लिंबू पाणी पिण्याचे नुकसान आणि ते कोणी पिणे टाळावे ते पाहूयात. 

लिंबू आम्लयुक्त असल्यामुळे उपाशी पोटी घेतल्यास अ‍ॅसिडिटी, जळजळ आणि पोटदुखीची समस्या वाढू शकते.

ज्यांना आधीच गॅस किंवा अ‍ॅसिड रिफ्लक्सचा त्रास आहे, त्यांच्यासाठी लिंबू पाणी अधिक त्रासदायक ठरू शकते.

लिंबूमध्ये सायट्रिक ॲसिड असते.लिंबूमधील आम्ल दातांच्या एनॅमलला नुकसान पोहोचवू शकते, दातांचे संरक्षक कवच कमकुवत करते आणि दात शिवशिवण्याची समस्या निर्माण होते.

रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्याने पोटातील जठराच्या अस्तराला सूज येऊ शकते, ज्यामुळे अल्सरचा धोका वाढतो.

लिंबू नैसर्गिक पद्धतीने लघवी होण्याचे प्रमाण वाढवते, यामुळे वारंवार लघवीला होऊन शरीरातील पाणी कमी होऊ शकते आणि डिहायड्रेशन होऊ शकते.

Click Here