अनेकांना रात्री मोजे घालून झोपण्याची सवय असते. असं करणं आरोग्यासाठी चांगलं की वाईट?
हिवाळ्यात रात्रीत वातावरणात गारवा असतो. या वेळी मोजे घालून झोपल्याने पाय उबदार राहतात.
मोजे घातल्याने शरीराचे तापमान राखण्यास मदत होते आणि झोपेत सुधारणा होते.
थंड पायांमुळे वारंवार झोपेचा त्रास होऊ शकतो आणि अस्वस्थता जाणवू शकते.
सुती आणि सैल मोजे घालणे अधिक आरामदायक आणि सुरक्षित मानले जाते.
खूप घट्ट मोजे घातल्याने रक्ताभिसरणावर परिणाम होऊ शकतो.
ज्या लोकांच्या पायांना खूप घाम येतो त्यांनी मोजे न घालता झोपावे.
हिवाळ्यात योग्य प्रकारचे मोजे घालून झोपल्याने फायदेशीर ठरु शकते.